असे होते माझ्या आठवणीतले प्रबोधनकार ठाकरे
प्रबोधनकार ठाकरे हे एक अजब रसायन होते. केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची ‘साताऱ्याचे दैव की दैवाचा सातारा’ या शीर्षकाखाली चार व्याख्याने झाली. प्रत्येक व्याख्यान अक्षरश: मन हेलावून टाकणारे होते. खोचक शब्दप्रयोग, भाषणात ऐतिहासिक शब्दांची रेलचेल हे ठाकरे यांचे खास वैशिष्ट्य. मी त्यांची आणखी काही भाषणे ऐकली; पण त्यांच्या आरंभीच्या चार भाषणांचा ठसा आजही माझ्या मनावर कायम आहे.......